सर्वप्रथम धन्यवाद माझ्या page वर आल्याबद्दल!

ही पाने मोडी लिपीबद्दल आहेत. उद्देश साधा आहे - मोडीबाबत तुम्हास थोडी माहीती व्हावी, आणि जास्ती उत्सुकता निर्माण व्हावी.

हे धडे कसे वाचाल?

पहिल्यांदा आपण फक्त अक्षरे बघू जशी आपण पहिलीमधे शिकलो होतो अगदी तशीच. सर्व पाने सारखीच आहेर. प्रत्येक पानावर एक खेळ आहे. आपण आपल्या सोयीप्रमाणे प्रत्येक धड्याचा अभ्यास करा.

मोजक्या धड्यांनंतरच तुम्हाला सर्व मोडी अक्षरे ओळखू येतील! नंतर आपण जोडाक्षरे शिकू
जर का आपल्याला मोडी येत असेल, तर इथे मोडी मधल्या गोष्टी वाचा.
आपण आता Transliteration पानावर मोडी मध्ये type पण करू शकाल.

कशी सुरूवात करायची?

सर्वप्रथम हा font download करा. आपण ऑक्टोबर ४, २०१० च्या आधी download केला असेल, तर c:\windows\fonts मधे जाऊन ModiGhate-Regular.ttf file काढून टाका. आणि font पुन्हा download करा. नंतर Windows Explorer मधे c:\windows\fonts उघडा. File-Install Font... वर click करा. नंतर download केलेली file (ModiGhate.ttf) select करा. Browser बंद करून पुन्हा सुरू करा. जर का धड्यांमधे सर्व काही मराठीतच दिसत असेल, तर font नीट install झालेला नाही.

आणखी माहिती कुठे मिळेल?

आणखी माहितीसाठी संकेतस्थळे ह्या पानावर आहेत. आपणास संकेतस्थळे सुचवायची असतील, तर Feedback form भरून कळवा.

मदत कशी करू शकाल?

  • Font मधे आपल्याला काही चुका आढळल्यास आम्हास जरूर कळवा.
  • ज्यांना मोडी येते, त्यांनी धड्यांबाबत जरूर मदत करावी (Your credits and copyright will be protected)